पॅंथर्स रिपब्लिकन पार्टीच्या मराठवाडा संपर्कप्रमुख पदी ज्येष्ठ कार्यकर्ते बाबुराव नरवडे यांची नियुक्ती !

गंगापूर(प्रतिनिधी लक्ष्मीकांत माघाडे) : पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या (महाराष्ट्र राज्य) मराठवाडा संपर्क प्रमुख पदी बाबुराव नरवडे यांची पक्ष प्रमुख मा.मंत्री गंगाधर गाडे व कार्याध्यक्षा सौ. सूर्यकांता गाडे यांच्या आदेशा नुसार नेमणूक करण्यात आली. नियुक्तीपत्रात पुढे म्हटले आहे कीआपण आपल्या मराठवाड्या मध्ये संघटन मजबूत व व्यापक करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करून दलित, बहुजन व अल्पसंख्याकांच्या सामाजिक व आर्थिक प्रश्नासाठी न्याय मिळवून देण्याकरिता सदैव तत्पर राहावे.व पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी, आपण गाव तेथे पक्ष ही बांधणी करावी. आपण केलेल्या कार्याची पक्षाने दखल घेऊन आपली मराठवाडा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात येत आहे. या वेळी मराठवाडा अध्यक्ष सर्जेराव मनोरे, मराठवाडा सरचिटणीस साहेबराव नवतरे ,मराठवाडा संघटक महेंद्र वाघमारे, जिल्हा अध्यक्ष किशोरभाई जाधव,प्रविन गाडेकर, धम्मपाल कांडेकर, विजय दिवेकर, सोमनाथ महापुरे,शहर अध्यक्ष रंजित साळवे ,रवि भगुरे, दिलपाक चंद्रमुणी ,राकेश साबळे ,संजय बनसोडे ,लताबाई थोरात ,साळवे, सिलाताई मनोहरे, तिनगोटेताई, जाधव ताई इत्यादी कार्यकर्ते हजार होते त्यांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.