छत्रपती संभाजीनगर : ( बिडकीन प्रतिनिधी) : एकता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला महाविद्यालय बिडकीन येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त मराठी विभाग व सांस्कृतिक विभागाच्या वतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा . अनिल गवळे होते. त्यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनो महापुरुषांच्या विचारांचे वारसदार व्हा असे प्रतिपादन गवळे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन आहेर होते. मराठी विभागाचे प्रा. मिलिंद ठोकळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले

, यावेळी डॉ. मुक्तियार शेख, डॉ. रामकिसन मुंडे, डॉ. मुजीब सय्यद, डॉ. प्रसाद करंदीकर, डॉ.रमेश गायकवाड,डॉ. अंजली काळे , डॉ. वैशाली पेरके, डॉ. मोहसीन शेख, तसेच शिक्षकेतर कर्मचारी नरहरी उबाळे, संभाजी आंधळे, अण्णासाहेब थिटे, शेख कयूम, तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ. अर्चना काटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. युसुफ पठाण यांनी केले.