पैठण (प्रतिनिधी) : पंढरीच्या आषाढी वारी आणि पंढरीनाथांच्या दर्शनासाठी हभप रघुनाथ महाराज गोसावी पालखीवाले यांच्या नेतृत्वाखाली गेलेला श्री.संत एकनाथ महाराज पायी पालखी सोहळा परतीच्या मार्गाने मजल दरमजल व सेवटचा मुक्काम नगर जिल्ह्य़ात करत बुधवारी कामिका एकादशीच्या र्वसंध्येला पैठणच्या नाथभूमीत दाखल झाला. पाटेगाव येथे सरपंच गोकुळ रावस तर प्रशासनाच्या वतीने तहसीलदार सारंग चव्हाण, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, न.प.मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष आगळे यांच्यासह हजारो भाविक भक्तांनी पारंपरिक पद्धतीने पालखीप्रमुख व सहभागी हजारो भाविक भक्तांचे स्वागत केले.
पारंपरिक वाद्य, फटाक्यांच्या तषबाजीत
भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावून वारकरी भाविक भक्त व शेतकऱ्यांचा आनंद या प्रसंगी द्विगुणित केला. पारंपरिक फुगडया,टाळ मृदंगाचा लयबद्ध निनाद, मूखी भानुदास एकनाथांच्या जयजयकारातआणि हरिनामाच्या एकसूरी गजरात रात्री उशिरा ही मिरवणूक मुख्य मार्गाने बाहेरच्या(समाधी )नाथ मंदिरात पोहचली. तेथे सांगता भजन, आरती व ईतर धार्मिक विधी रंपरिक पद्धतीने संपन्न झाले. त्यानंतर रात्री उशिरा गावातील(राहता वाडा) नाथ मंदिरात यंदाच्या 425 व्या पायी पालखी सोहळ्याची सांगता झाली. यावेळी नाथ वंशज हभप रावसाहेब महाराज गोसावी, सौ.रेखाताई कुलकर्णी व मराठवाडय़ाच्या कानाकोपऱ्यातून आलेले तसेच पैठणकर भाविक भक्त वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.