पैठण येथे भानुदास महाराजांची ५११ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

पैठण येथे भानुदास महाराजांची ५११ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

पैठण, (प्रतिनिधी) दक्षिण काशीतील श्रीक्षेत्र पैठण येथे शनिवारी आषाढी शुद्ध चतुदशी शुभ पर्वतावर मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात गावातील नाथ मंदिरात संत श्रेष्ठ भानुदास महाराज यांची ५११ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
पुरोहित नागेश उपाध्ये यांच्या मंत्रघोषात प्रदीप गोसावी, चैतन्य गोसावी व प्रशांत गोसावी यांच्या हस्ते विजयी पांडुरंग व भानुदास महाराज मुर्तीचा महा अभिषेक करण्यात आला. यावेळी भाविकांनी भानुदास एकनाथांचा गजर करून मंदिर दुमदुमून टाकले. या प्रसंगी हरिपंडीत महाराज गोसावी यांनी भानुदास महाराजांच्या कार्यावर मनोगत व्यक्त केले. यावेळी महिलांनी भजने, भावगीते व भारुडे गायली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भक्ती कुळकर्णी, मीरा भवर, जयश्री मडके, पुजा पारीख, जयश्री भावसार, निर्मला पोपळघट, जयश्री कुळकर्णी, महेश मडके, तुकाराम बडसल, काका लोहकडे, दिलीप कबाडे, रवींद्र कोरांने, विश्वनाथ थेटे, जगदीश पाचोडकर, महेंद्र महाराज बनकर नागपूरकर, अशोक कुळकर्णी, प्रकाश खेडेकर, दिनेश पारीख, बंडेराव जोशी आदिंनी विशेष परिश्रम घेतले

. भानुदास महाराज प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून महा आरतीने उत्सवाची सांगता झाली. भानुदास महाराजांचा जन्म पैठणमध्ये इ. स. १४४८ मध्ये झाला. भानुदास महाराजांनी कर्नाटकातील विजयानगर येथून कृष्ण देवराया या राजाकडून पांडूरंगाची मुर्ती पुन्हा मिळवली व इ.स.१५०६ च्या कार्तिकी एकादशीला वयाच्या ५८ व्या वर्षी पंढरपूरला आणली. मुख्य पांडुरंग मंदिर परिसरात इ.स.१५१३ ला वयाच्या ६५ व्या वर्षी देह ठेवला. श्रीक्षेत्र पंढरपूर येथील मुख्य पांडुरंग-रुख्मीनी मंदिरात पुण्यतिथी निमित्ताने भानुदास महाराज समाधीची पुजा अर्चा सोहळा रघुनाथ महाराज पालखीवाले गोसावी यांच्या हस्ते पार पडला.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *