छत्रपती संभाजीनगर । प्रतिनिधी छत्रपती संभाजी नगरमध्ये सध्या बिबट्याची दहशत आहे दोन दिवसांपूर्वी शहराच्या मध्यभागी असलेल्या उल्कानगरी भागात बिबट्या आढळून आलाय सीसीटीव्ही कॅमेरात तो कैद झालाय आणि त्यानंतर परिसरामध्ये प्रचंड दहशत आहे.. ४८ तास झाले मात्र अजूनही बिबट्या हाती लागलेला नाही. संभाजीनगरमध्ये सध्या एका बिबट्याची दहशत आहे. संभाजीनगरच्या उल्कानगरी भागात सोमवारी दिसलेल्या बिबट्याचा शोध अद्यापही सुरुच आहे. खिंवसरा पार्कजवळ हा बिबट्या दिसला होता. या विबट्याच्या शोधा साठी जुन्नर आणि नाशिक येथून मंगळवारी संध्याकाळी तज्ज्ञांची दोन पथके शहरात दाखल झाली आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची ६ पथकं तैनात करण्यात आली असून १०० हून अधिक वनकर्मचारी त्याचा शोध घेत आहेत. तसंच मानवी वस्तीभोवती संरक्षक जाळीही लावण्यात आली आहे. छत्रपती संभाजी नगरच्या उल्कानगरीत बिबट्याची दहशत आहे. एरवी गजबजलेल्या गल्ल्या आता पूर्णतः निर्मनुष्य झालेल्या आहेत. सर्व घरांचे दरवाजे खिडक्या ही बंद आहेत. लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत. दोन दिवसांपूर्वी या परिसरात बिबट्या दिसला. सीसीटीव्हीत बिबट्याच्या हालचाली कैद झाल्या आहेत. यानंतर सगळीकडेच या बिबट्याची भीती पसरली आहे. वन विभागाला कळवण्यात आले. वन विभागाची टीम बिबट्याचा शोध घेत आहे. मात्र, बिबट्या काही सापडायचं नाव घेत नाही

. बिबट्या सापडत नसल्याने परिसरातील नागरिक धास्तावले आहेत. त्यामुळे त्यांनीमुलांना शाळेत पाठवनही बंद केले आहे. मुलांनी रस्त्यावर खेळणं सुद्धा बंद केले आहे. इतकच नाही तर कॉलनीतले लोकांनी मॉर्निंग वॉक, रस्त्यावरील गप्पा हे सगळं सगळं बंद केल आहे. परिसरातील महिला सुद्धा आता रस्त्यावर येऊन एकमेकांसोबत बोलण्याऐवजी घराच्या गॅलरी किंवा खिडकीतूनच एकमेकांशी संवाद साधत आहे. हा बिबट्या लवकरात लवकर सापडावा असं सगळ्यांचं म्हणणं आहे. बिबट्याच्या शोधासाठी १०० वर कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पुणे आणि नाशिक इथून रेस्क्यू टीम दाखल झाल्या आहेत. परिसरात असलेल्या दाट झाडीत बिबट्या लपला असावा असा संशय असल्याने तिथे पिंजरा सुद्धा लावण्यात आला आहे. मात्र, बिबट्या काही सापडत नाही. हा बिबट्या मादा असावा असं तज्ञांचा म्हणणं आहे जर पिल्लं असतील तर तो निश्चितपणे इथे असेल अन्यथा निघून गेला असेल असेही ते सांगतात. मात्र खात्री झाल्याशिवाय वन विभागाचे पथक इथून हटणार नाही असं वनपरिक्षेत्र अधिकारी सांगतात. सातारा परिसरातील डोंगरातून हा बिबट्याला आला असावा असा संशय आहे.