वैजापूर, (प्रतिनिधी): हडसपिंपळगाव शिवारात वैजापूर पोलिसांनी रात्री गस्तीवर असताना दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघा संशयित चोरट्यांना पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने गुरुवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पकडले आहे. तर दोघे चोरटे घटनास्थळावरून फरार झाले. पोलीस व ग्रामस्थांनी परिसर पिंजून काढत या चौघा संशयित चोरट्यांना पकडले आहे.
या घटनेबाबत पोलीस व ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री गस्तीवर असताना वैजापूर पोलीस ठाण्याचे संदीप पवार यांना तिघे संशयित दरोड्याच्या तयारीत असल्याचे दिसले पोलिसांची गाडी थांबताच त्यातील दोघे पळाले तर एकाला पकडण्यात पवार यांना यश आले. त्यांनी तातडीने याबाबत पोलीस पाटलांना फोनवर महिती देत बोलावून घेतले पोलीस पाटलांनी घटनास्थळी आल्यावर संशयीत गावातील रहिवासी नसल्याचे कळवले व ग्राम सुरक्षा रक्षकांच्या मदतीनें अन्य चोरट्यांची शोध मोहीम सुरू केली

. वैजापूर पोलीस ठाण्याचे योगेश झाल्टे, बिरुटे, मेटे व बनगे यांनी ग्राझम सुरक्षा दलाच्या मदतीने परिसर पिंजून काढला तेव्हां त्यांनी अन्य तीन संशयिताना पकडले चौघांनाही वैजापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी शेख अमीर शेख नब्बु वय २७ वर्षे (रा. सईद कॉलनी), उमर रजोद्दीन सम्यद वय २० वर्षे (रा. रशिदपुरा टि. व्ही. सेंटर), अमजद खान सलीम खान वय २६ वर्ष (रा बुढीलाईन हमखास मैदानाजवळ हिलाल कीलनी) , इमरान खाँन यूनुस खाँन वय २२ वर्षे (रा. शरिफ कोलनी बाबर कॉलनीजवळ), अरबाज शेख (रा रोमानिया कॉलनी), रियान शेख (रा. मिसारवाडी नारेगावजवळ) सर्व छत्रपती संभाजी नगर या सहा जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार संदीप पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अरबाज शेख व रियान शेख हे दोघे फरार झाले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. अटक केलेल्या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी लोखंडी पाईप, हातोडी, रॉड, व २ दुचाक्या व रोखअसा ६११८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नरवडे हे करीत आहे.