हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे नवनिर्वाचित खासदार मा.श्री. कल्याणजी काळे साहेब यांचा जाहीर सत्कार!

हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे नवनिर्वाचित खासदार मा.श्री. कल्याणजी काळे साहेब यांचा जाहीर सत्कार!

वाढदिवसाचे औचित्य साधून केला सत्कार!

छत्रपती संभाजीनगर: हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे जालना लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार मा. श्री. कल्याणजी काळे साहेबांची आज त्यांच्या छत्रपती संभाजीनगर राहते घरी भेट घेऊन हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे जंगी सत्कार करण्यात आले. खासदार श्री. कल्याणजी काळे साहेब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे राज्य प्रवक्ता शेख अब्दुल रहीम सर यांनी परंपरेनुसार पुष्पगुच्छ न देता पुस्तक, एक शानदार स्मृतिचिन्ह आणि शाल देऊन नवनिर्वाचित खासदार मा.श्री.कल्याणजी काळे साहेब यांचा सत्कार करण्यात आला

तसेच त्यांना वाढदिवसानिमित्त आगाऊ शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी व कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. शेख अब्दुल रहीम सर यांनी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन अणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनच्या कार्याची माहिती दिली. सोबतच देशाच्या संसदेत ( लोकसभेत) जुन्या पेन्शनचा मुद्दा मांडावा अशी विनंतीही केली. या वेळी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे भावी अध्यक्ष तथा शेख अब्दुल रहीम सर यांचे चिरंजीव जिशान अहमद अणि इतर सहकारी उपस्थित होते…

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *