कन्नड , (प्रतिनिधी) जिल्हाभरात प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू, पान मसाला, गुटखा विक्री सुरू आहे मात्र मोठी जील्हात विक्री पण मोठी कारवाई निदर्शनास आलेली नाहीच. या गुटखा विक्रीची व वाहतुकीची सुट प्रशासना कडून कोणा साठी दिली जाते ?
अन्न व औषधी प्रशासन व पोलिस आणि महामार्गावरील मुख्य पोलीस चौकी यांना मुख्य म्हणजे आता पर्यंत शेकडो हजारो कोटी चा शहरात आलेला गुटखा, पान मसाला, प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू, खुलेआम ट्रक द्वारे वाहतूक करुन शहरातील प्रत्येक गल्लीत तालुक्यातील प्रत्येक गावात, गावातील किराणा दुकानात तर शहरातील प्रत्येक पान टपरी वर पोहचते ही बाब आश्चर्यचकित करते . गुटखा माफिया इतक्या हिमतीने, निडरपणे गुटखा आणतात च कसा ?
तसेच मोटारसायकल वर शहरात तालुक्यात विकतात याचाच अर्थ प्रशासनाचा संबंधित गुटखा किंगवर वचक नसावा ? प्रशासनाचा वचक नसल्यामुळेच तर गुटखा विक्री माफिया एवढी प्रचंड मोठी हिम्मत करत असतील ?
इतक्या वर्षात प्रशानातील अधिकारी कर्मचारी यांचा निदर्शनास हा प्रकार आला नसेल का ?
प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी या गुटखा माफियान सोबत आर्थिक हितसंबंध जोपासत असावेत का?
बर आर्थिक हितसंबंध नसतील तर संबंधितावर कारवाईसाठी दिरंगाई का?

सर्वोच्च न्यायालयाने प्रतिबंधीत केलेल्या या जीवघेणा सुगंधित तंबाखू, पान मसाला, विविध प्रकारचा गुटखा विक्री वर व वाहतुकीस प्रतिबंध केलेला असताना गुटखा माफिया कन्नड शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गावात मोठ्या हिमतीने निडरपणे गुटखा आणतात म्हणजे अन्न औषध प्रशासन विभाग व पोलिस प्रशासन व कायद्या पेक्षा हे वरचढ आहेत हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होत नाही का ?
तात्काळ पोलिस प्रशासन व अन्न औषध प्रशासन विभागाने तातडीने या गुटखा माफिया विक्रेत्या वर कारवाई करावी.
अशी मागणी कन्नड पिशोर सुज्ञ शहर वासीयांन कडून केली जात आहे.