छत्रपती संभाजीनगर । प्रतिनिधी खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा पुढचा भाग ज्यात ५० किमी भागातील २२ ग्रामपंचायती येतात त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा व कालबद्ध कार्यक्रम आखावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले. खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा आढावा आज घेण्यात आला. जिल्हा नियोजन सभागृहात ही बैठक पार पडली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच इको सत्व या संस्थेचे अधिकारी, सदस्य तसेच ग्रामसेवक, पाटबंधारे, कृषी, सामाजिक वनीकरण आदी संबंधितविभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पात ग्रामिण भागातील ५० किमी लांबीच्या भागात काम सुरु करण्यात आले आहे. त्यात २२ ग्रामपंचायतींचा समावेश होतोहे काम तीन टप्प्यात करण्यात येणार आहे.

त्यात संबंधित गावांमधील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन ज्यात त्या त्या ग्रामपंचायत हद्दीतील कचरा व सांडपाणी हे नदीत न जाऊ देता त्याची विल्हेवाटत्य बि च अ न जि रा के अ गावातच लावणे ही कामे करण्यात येतील. दुसऱ्या टप्प्यात नदी रुंदीकरण वि व काठांचे अस्तरीकरण व तिसऱ्या टप्प्यात वृक्षरोपण यापद्धतीने काम करण्यात येत आहेत. त्यासाठी ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग घ्यावा. यंत्रणांनी नदींचे सिमांकन करुन द्यावे. निळ्या पूररेषेची निश्चिती करणे यासारखी कामे करुन द्यावीत. ही कामे कालबद्ध पद्धतीने विहित वेळेत करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी ग्रामपंचायतींनी या प्रकल्पात आपापले योगदान द्यावे असे आव्हान केले