वैजापूर, (प्रतिनिधी) : वैजापूर कोपरगाव रस्त्यावर बेलगांवजवळ पोलिसांनी पिक अप वाहनातून सहा गोवंश जनावरांची बेकायदा वाहतूक होत असताना हे वाहन जनावरांसह हस्तगत केले व सहा गायीची सुटका केली. या कारवाईत वाहन व सहा गायींसह तीन लाख ५६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी कोपरगाव येथील नईम नियाज शेख (संजयनगर) याच्याविरुध्द वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणाची अधिक माहिती अशी की, कॉन्स्टेबल तिरथ पंडुरे हे सोमवारी पोलिस ठाण्यात काम करत असतांना त्यांना ११२ वरून माहिती मिळाली कि बेलगांव रस्त्यावर कोपरगाव येथून वैजापूरकडे जाणाऱ्या वाहनमधून जनावरांची वाहतूक होत आहे. या माहितीच्या आधारे पंडुरे, हेड कॉन्स्टेबल अविनाश भास्कर, कॉन्स्टेबल कुलट हे त्या ठिकाणी गेल्यावर त्यांना महिंद्रा पिक अप बोलेरो गाडी आढळून आली. या गाडीची पाहणी केली असता त्यात सहा गोवंश जातीची जनावरे आढळून आली

. चालकाकडे वाहतूक परवाना नव्हता. त्यामुळे पोलिसांनी अडीच लाख रुपये किंमतीची गाडी व सहा जनावरे असा मुद्देमाल हस्तगत केला याप्रकरणी पंडुरे यांच्य फिर्यादीवरून आरोपीविvरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हेड कॉन्स्टेबल किसन गवळी हे करीत आहेत.