भक्ताच्या भाव भक्तीत मोठी ताकद भगवंतावर ऋध्दा अपुर्ण नव्हे पुर्ण असावी – शनिभक्त सुखदेव महाराज

भक्ताच्या भाव भक्तीत मोठी ताकद भगवंतावर ऋध्दा अपुर्ण नव्हे पुर्ण असावी – शनिभक्त सुखदेव महाराज

कन्नड (प्रतिनिधी) – तालुक्यातील शनिभक्त परिवाराचे श्रध्दास्थान वाकी-नेवपुर येथे गुरुवारी’ शनी महाराज जयंती उत्सव’ कलश मिरवणूक काढुन साजरी करण्यात आली. वाकी-नेवपुर येथील श्रीशनेश्वर देवस्थान येथे शनिभक्त श्री १००८ महामंडलेश्वर सुखदेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी सात वाजता शेकडो भक्तांच्या उपस्थितीत टाळमृदुगाच्या गजरात गावातुन शनेश्वराचा जयघोष करत’ कलश’ मिरवणूक काढण्यात आली. दुपारी बारा वाजता देवस्थान येथे शनिभक्त सुखदेव महाराज यांच्या उपस्थितीत पंचामृत सह तेलाभिषेक व पुंजन करण्यात आले. यावेळी महाराज यांनी भक्तांना उपदेशपर प्रवचनातून मार्गदर्शन केले

. कन्नड येथील उद्योजक मनोज १ पवार यांनी शनीमहाराज मुर्ती चे पुंजन करुन शनिभक्त सुखदेव महाराज यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. व मंदिर बांधकामासाठी एकावन्न हजार देणगी दिली. यावेळी बबनराव बनसोडे, मधुकर पडोल, सचिन गव्हाने, प्रवीण सुलताने
महाराज, बबनराव बनसोड, अरुण गीते, नामदेव देशमुख, शरद कर्डिले, दौलत खाडे, सुनील ढवण, अजित इंगळे, सचिन गव्हाणे, भरत सुडके, नवनाथ खालकर, सुखदेव सपकाळ, रवींद्र महाराज महाले, गणेश मुडे,,पवन ठाकूर, रुपेश भारुका, सतीश खिल्लारे, माधव गवले, नारायण शेळके सोमनाथ चौधरी राजेंद्र बजाज, प्रशांत जाधव, यांच्या सह छत्रपती संभाजी नगर, नाशिक, निफाड, जळगाव, परिसरातील भाविक उपस्थित होते. सर्वांना महाप्रसादाचा लाभ घेतला.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *