छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त विटखेडा वार्डातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्ध अभिषेक पुष्प वर्षाव करून फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन विटखेडा वॉर्डातील नागरिकांच्या व शिवप्रताप मित्र मंडळ विटखेडा यांच्या वतीने साजरा करण्यात आला.

यावेळी युवा सेनेचे युवा नेते सिद्धार्थ घोडेले, शिवसेना ठाकरे गटाचे शाखाप्रमुख विक्रम खडके पाटील, महेंद्र घोडेले, भारतीय जनता पार्टीचे वैभव भानुसे पाटील, पश्चिम मतदार संघातील सामाजिक कार्यकर्ते गौतम सोनवणे, भीमशक्ती पश्चिम शहर उपाध्यक्ष राजूभाऊ बनकर, बाबासाहेब खडके, रवी जगदाळे, कृष्णा खडके, सचिन खडके, विष्णु जगदाळे, परमेश्वर आगळे, संजय पवार, किशोर खडके, जेष्ठ शिवसैनिक गोरख आबा खडके, ज्ञानेश्वर खडके, सतीश खडके, विष्णु देवकर, शिवसेना महिला आघाडी शिंदे गटाच्या लक्ष्मी म्हस्के, जयश्री इंदापुरे, भादे ताई इत्यादी सह मोठया संख्येने शिवप्रेमी व वॉर्डातील नागरिकांची उपस्थिती होती.