पुणे (प्रतिनिधी) :पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर आणि एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. नमुन्यांमध्ये फेरफार करण्यासाठी आरोपींनी लाखो रुपयांची लाच घेतल्याचीही बाब उघड झाली आहे
. त्यामुळे आता या प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता ससून रुग्णालयातील अटक आरोपीने इतरही नावे उघड करण्याची धमकीदिली आहे.
एका रुग्णालयातून वृत्तानुसार अटक आलेल्या ससून करण्यात तिघांपैकी आरोपी डॉ. अजय तावरेने हा धमकीवजा इशारा दिला आहे. मी शांत बसणार नाही, सगळ्यांना उघडं पाडेन, असे अजय तावरेने म्हटल्याचे या वृत्तामध्ये नमूद करण्यात आले आहे. सध्या ससून रुग्णालयातून अटक केलेले तिथे आरोपी पोलीस कोठडीत असून सोमवारी न्यायालयाने त्यांच्या कोठडीत ३० मे पर्यंत वाढ केली आहे.