हंगामाच्या सुरवातीला पैसा मिळाल्याने शेतकरी आनंदात
कन्नड(प्रतिनीधी)-तालुक्यातील ६६ हजार ३५ शेतक-यांच्या मका, कापूस, मुग, उडीद, तूर, बाजरी, भूईमुग या २०२३- २४ खरीप हंगामातील पिकांसाठी ४९ कोटी २९ लाख ११ हजार १११ रुपयांचा पीकविमा मंजुर झाला आहे. यापैकी ४६ हजार शेतक- यांच्या बँक खात्यात २९ कोटी २९ लाख १० हजार १११ रूपये इतकी पिकविण्याची रक्कम जमा
झाली आहे. तर उर्वरित २० हजार ३५ शेतक- यांचे १९ कोटी रुपये लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक यांनी दिली आहे

. ऐन हंगामाच्या सुरवातीला ही पिकविण्याची रक्कम हाताशी आल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. २०२३-२४ च्या खरीप हंगामातील तूर, कापूस, मका, बाजरी, मुग, उडीद, भुईमुग या पिकांच्या नुकसानीची ७२ तासांच्या आत पिक विमा कंपनीकडे, नुकसानीच्या फोटों सह ऑनलाईन दाखाल
करणा-या शेतक-यांनाच पीकविमा मंजुर झाला आहे. सदरील पिकविण्याची रक्कम ऐन हंगामाच्या,शेती मशागतीच्या वेळीच बँक खात्यात जमा झाल्याने, शेती मशागती बरोबरच बी बियाणे, खते घेण्यासाठी या रकमेचा उपयोग होणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.