पैठण : पैठण येथील श्रीसंत एकनाथ महाराज मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकाची मोटरसायकल चोरी करून पळून जात असताना मंदिराच्या सुरक्षारक्षक यांनी शनिवारी दि. २५ रोजी चोरून घेऊन चाललेल्या मोटरसायकल सह अंबड येथील दोन सख्या भावाना पाठलाग करून पकडले आहे. सदरील चोरट्यांना अधिक तपासासाठी पैठण पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की बालमटाकळी ता. शेवगाव जिल्हा अहमदनगर येथील वैभव भिमराव घुले हे आपल्या कुटुंबासह श्रीसंत एकनाथ महाराज समाधी दर्शन घेण्यासाठी शनिवारी रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान पैठण येथे आले असता. मंदिराच्या परिसरात आपली हिरो होंडा कंपनीची शाइन मोटरसायकल क्रमांक चक १६ डि.ए ४९६६ मंदिरासमोर उभा करून दर्शन दर्शनासाठी गेल्याच्या संधीचा फायदाघेऊन विठ्ठल भाऊराव खरात व बाळू भाऊराव खरात रा. अंबड जिल्हा जालना या चोरट्यांनी सदरील मोटरसायकल चोरून नेत असल्याची माहिती काही नागरिकांनी नाथ मंदिर सुरक्षारक्षक राजू मिसाळ, दत्ता जानकर यांना दिली

तात्काळ मोटर सायकल चोरून नेणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग या सुरक्षारक्षकांनी करून अखेर स्टेडियमच्या बाजूला पेट्रोल पंपाच्या परिसरात या दोन चोरट्यांना मोटर सायकलसह पकडून पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या ताब्यात दिले. या चोरट्याची अंबड पोलिसांकडून इतर काही ठिकाणी गुन्हे केलेले आहे का याबद्दल माहिती मागविले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण पोलीस करीत आहे.मंदिर परिसरातील चोरटे पकडून दिल्याबद्दल मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष तथा पालकमंत्री संदीपान भूमरे, कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे, मंदिर मॅनेजर गजानन झोल यांनी सुरक्षारक्षकाचे अभिनंदन करून कौतुक केले आहे.