गंगापूरः तालुक्यातील ढोरेगाव न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या बारावी कला शाखेचा ९८ टक्के निकाल लागला यात मुलींनी मारली बाजी. या परिक्षेत प्रथम सानिया बिबन शेख- ७६.१७ टक्के, द्वितीय क्रमांक श्रद्धा बाळू पुरी ७६ टक्के, तृतीय क्रमांक निता अनिल शिंदे ७५.६७ टक्के घेऊन या विद्यार्थीनींनी यश संपादन केले आहे.

सर्व यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे शालेय समिती अध्यक्ष अय्युब पटेल, प्राचार्य श्रीकांत झिरपे, उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक मिसाळ, फुलारे, शेवाळकर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतूक केले आहे.