कन्नड (प्रतिनिधी शिवाजी नवले) :तालुक्यातील पिशोर येथे २५ शनिवार रोजी येथील मोठा गणपती मंदीर व झोपडपट्टीतील संतप्त महिलांनी डफडे लावून सकाळी १० वाजेच्या दरम्यान हा मोर्चा काढण्यात आला

.
पिशोर येथील अंजना पळशी मध्यम प्रकल्पातून अर्धा कन्नड तालुका व अर्धा सिल्लोड तालूक्यातील गावांना टँकरद्वारे रोज पाणी पुरवण्यात येते मात्र पिशोर वासीयांना ८ दिवसाआड पाणी येते व तेही वेळेवर मिळत नसत्याची ओरड होत आहे व या पाण्यावरुन ग्रामस्थामध्ये रोजच तू तू में में होत असल्याने समजदार महिलांनी आज दोन डफडे लावून वाजत गाजत
ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा काढून तब्बल दिड तास ठिय्या मांडून ग्रामसेवकास दोन्ही ठिकानावर जाऊन परिस्थिती पाहण्यास लावली. दरम्यान माजी सरपंच पी.एम. डहाके यांनी ग्रामपंचायत मार्फत दिलगिरी व्यक्त करुन पाणी वेळेवर मिळेल असे आश्वासन दिल्यानंतरच संतप्त महिलांनी हा हंडा मोर्चा थांबविला.