नांदुर मधमेश्वर जलदगती कालव्यातून मिळणार पाणी
वैजापूर, (प्रतिनिधी) नांदुर मधमेश्वर जलदगती कालव्यातून वैजापूर, गंगापूर व कोपरगाव तालुक्यातील १०२ गावांसाठी उन्हाळी आवर्तनाच्या माध्यमातून पिण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय झाला असून याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक सं. स. तिरमनवार यांनी गुरुवारी आदेश काढले असून या आदेशान्वये नांदूर मधमेश्वर समूहातील धरणातून ८०० द. ल. घ. फु. पाणी पिण्यासाठी सोडण्याचे निर्दे श देण्यात आले आहेत.त्यामुळे कालव्यातून पाणी सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आदेश निर्गमित झाल्यानंतर वैजापूर येथील नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागामार्फत गुरुवारीच पाणी सोडण्याबाबत पाठपुरावा सुरु करण्यात

सातत्याने पाठपुरावा
सर्वच गावांना पाणी मिळणे शक्य नसले तरी जास्तीत जास्त गावांना पाणी देण्याचे नियोजन करण्यात येत असून ज्या ग्रामपंचायतिनी पाण्याची मागणी केली आहे त्या गावांना प्राधान्याने पाणी मिळण्याची शक्यता आहे. केवळ पिण्यासाठी कालव्याचे पाणी वापरण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. हे पाणी मिळण्यासाठी आधार शेतकरी जलदूत समितीचे पंडित अण्णा शिंदे, रामचंद्र पिल्दे यांनी प्रभावी आंदोलन करत जलसमाधी आंदोलन करत लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. महिलांनीही आंदोलन केले होते. यानंतर नामकाचे कार्यकारी अभियंता राकेश गुजरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला.