भाव चांगला मिळण्यासाठी बळीराजाला अपेक्षाः घाटनांद्रा व परिसरात मिर्चीचे व आद्रकची लागवड क्षेत्रात वाढ

भाव चांगला मिळण्यासाठी बळीराजाला अपेक्षाः घाटनांद्रा व परिसरात मिर्चीचे व आद्रकची लागवड क्षेत्रात वाढ

सिल्लोडः (प्रतिनिधी) तालुक्यातील घाटनांद्रासह परिसरात मिर्ची व अद्रक पिकालाच चांगला भाव गेल्या वर्षी मिळाल्याने यंदा घाटनांद्रासह परिसरात म्हणजे धारला, चारनेर व चारनेरवाडी, धावडा, शिदेफळ, कोटनांद्रा, देऊळगांव बाजार, चिंचवण, पेडगांव, जाभंई, केळगांव, सावखेडा, तळणी, या गावामध्ये मिर्ची व अद्रकची लागवड क्षेत्रात वाढ असल्याचे सध्या चित्र पाहवयास मिळत आहेत. तसेच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासुनच सुरु झालेली । मिर्ची लागवड अद्दापही सुरु आहे. मुंदवाडी, धावडा, आमठाणा घाटनांद्रा आदि परिसरातील रोपवाटीकेमध्ये • सध्या मिर्ची रोप उपल नाही. बहुतांश शेतकऱ्यांनी (१) ते (१५) एप्रिलपर्यंत मिर्ची लागवड केलीली आहे. यंदा स्वर्वही मोठ्या प्रमाणात वाढलाग तवर्षीच्या तुलनेत यंदा मिर्ची लागवड खर्च वाढल्याचे पेडगांवचे शेतकरी सुरेश पारखे, चारनेर गावातले शेतकरी नयुम पटेल (टेलर) सह इतर शेतक-यांनी सांगितले. तसेच रोप आणि मल्चिंग व खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झालेली दिसत आहे. यातच मजुरांचा तुटवडा त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत

. अशी परस्थिती राहिली तर मिचीं तोडणी कशी होईल ही भीती आहे. तसेच जुनच्या पहिल्या आठवड्यात तोडणीला सुरुवात होईल. अद्रक लागवड क्षेत्रातही वाढ सध्या आद्रक पिकांला सहा ते आठ हजार रूपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव असल्याने पारंपारिक मक्का आणि कापूस क्षेत्राला फाटा देत बहुताश शेतकरी मिर्ची व अद्रकची लागवड करण्यावर भर देत आहे. सध्या विहिरीने तळ गाढला असुन दररोज किमान दहा ते पंधरा मिनीट पिकाला पाणी देताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. तालुक्यात घाटनांद्रा ते आमठाणा येथील मिर्ची बाजारपेठ मोठी असुन येथुन परराज्यात मिर्ची व अद्रकची निर्यात होते. म्हणजे मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल, अशा विविध राज्यातुन व्यापारी वर्ग येऊन मिर्ची व अद्रकची खरेदी करण्यासाठी येतात तसेच मिर्ची व अद्रकच्या हंगामात मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपल होत आहे. व वाहन धारकाही भाडे मिळतात शेतकरी आपल्या शेतातून मिर्ची व अद्रकच्या पिकाला बाजारपेठे पर्यंत आणण्यासाठी लहान मोठे वाहानांने आणून आपला माल विकतात यामुळे वाहनचालक व वाहधारक यांना रोजगार उपल होतो. असे वाहनचालक व वाहधारक संजय चोतमोल, अकील पांडे, सुरेश सोनवणे यांनी सांगितले आहे.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *