घारेगाव सुकना नदीत महसूल विभागाने पकडलेले वाहने सोडल्याच्या चर्चेला उधाण.
पैठण प्रतिनिधी : एकीकडे शासन अवैध्य गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध लावण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे.त्यासाठी शासनाने अवैध्य गौण खनिज उत्खनन व वाहतूक करीत असलेल्या वाहनावर गौण खनीजाच्या रकमेपेक्षा चारपट दंड आकारण्याचा अध्यादेश आहे.परंतु पैठणच्या महसूल मधील काही जबाबदार अधिकाऱ्यांनीच शासनाच्या निर्णयाला ठेंगा दाखवुन छुपी आर्थिक देवाण घेवाण करत मालिदा खाण्याच्या उद्देशाने घारेगाव येथिल सुखना नदी पात्रातून अवैध्यरित्या वाळू उपसा करणाऱ्या एका वाहनांवर किरकोळ कारवाई करुन एक जेसीबी व काहीं वाहनांना सोडुन दिले असल्याची जोरदार चर्चा या परिसरातील नागरीकांमध्ये चालु आहे.

या विषयी माहिती असी की रविवार रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घारेगाव येथील सुखणा नदी पात्रात एका जेसीबी यंत्र व ट्रॅक्टर वाहनाच्या सहाय्याने अवैध वाळूचा उपसा करत असताना गौण खनिज उत्खनन विरोधी पथकातील नायब तहसीलदार राहुल बनसोडे, मंडळ अधिकारी वैशाली कांबळे, तलाठी निकम यांनी पकडले होते.परंतु या परिसरातील नागरीकांमधे आता अशी चर्चा चालु आहे की,महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी यात मोठे अर्थकारण करून मलीदा खाण्याच्या उद्देशाने अवैध्य गौण खनिज चोरावर कारवाई करण्याचा निव्वळ देखावा करत त्यात फक्त एकच वाहन वाळुसह जप्त केल्याचे दाखवून त्या जेसीबी यंत्राला व अन्य वाळूच्या वाहनांना सोडले असल्याच्या चर्चांना या परिसरात आता पेव फुटले आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी होऊन महसूल विभागाच्या पथकाने खरेच ते वाहने पकडली होती काय ? किंवा पकडली असेल तर किती पकडले ? व पकडुन का सोडली ? याची छत्रपती संभाजी नगरचे कर्तव्यदक्ष मा. जिल्हाधिकारी तसेच पैठण, फुलंब्री उपविभागीय अधिकारी यांनी या गौडबंगाल प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी या परिसरातील पर्यावरण प्रेमी नागरीकांकडून होत आहे.

घारेगाव येथील सूखना नदी पात्रात गौण खनिज उत्खनन विरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई म्हणजे केवळ देखावा असून प्रत्यक्षात महसुलच्या पथकाने या परिसरातील वाळू चोरांसी हात मिळवणी करून एकाच वाहनांवर किरकोळ कारवाई केली व एक जेसीबी यंत्र व काही वाहने सोडुन दिले असल्याची जोरदार चर्चा या परिसरातील नागरीकांमध्ये होत आहे.