संभाजीनगर (प्रतिनिधी) :-यावेळी पूज्यनीय भन्तेगण व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. आनंद बुद्धविहार ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वारापासून पुढे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक वडगाव येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, सावित्रीबाई फुलेनगर वडगावपासून साजापूर वडगावमार्गे साईबन हाऊसिंग सोसायटीमध्ये दाखल झालेल्या धम्म रॅलीचे सोसायटीच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी रेखा निकम, कांचन कदम, रत्नमाला सावते, स्वाती लिहिणार, निकम यांनी धम्म रथाचे पूजन केले
यावेळी मुख्य आयोजक संजय निकम व यशपाल कदम यांच्या वतीने

आयोजित रॅलीमध्ये सहभागी ६०० ते ७०० उपासक उपासिका यांना भोजनदान करून साईबन हौसिंग सोसायटी मध्ये रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी संस्थापक अध्यक्ष .संजय निकम, यशपाल कदम, गणेश लिहिणार, नामदेव सावते, अमोल निकम, रतन कवाळे ‘ राजकुमार गोरगिले आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.