छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी):डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान, गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ संस्थेच्या वतीने महाकारूणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५६८ व्या जयंतीनिमित्त गुरुवारी (दि.२३) केंद्रात अभिवादन कार्यक्रम व रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.अभिवादन कार्यक्रमात मानसोपचार तज्ञ व आहारतज्ञ हेमा थोरात यांनी श्रीराम धसे यांनी रक्तदान श्रेष्ठ दान आहे व करावे असे आवाहन केले. वाघ डॉ. उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानंतर सर्वांना सर्वांनी ते केले व सर्वांना बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. धीरज दत्तात्रय अभंग यांचा प्रथम रक्तदानाने शिबिराची सुरुवात झाली. केंद्रातील महिलांमधून अन्नपूर्णा प्रकल्पाच्या सपना गायकवाड यांनी सहभाग नोंदवला. ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. निवृत्ती मोरे यांच्या नेतृत्वाखाली दत्ताजी भाले रक्तपेढीची टीम रक्तसंकलनाचे कार्य केले. या शिबीराची सुरुवात गोपाल गायकवाड यांच्या त्रिशरण पंचशील व बुद्ध वंदनाने झाली

. किशोरी विकास प्रकल्पाच्या युवती राजश्री मस्के ईने गायलेले घराकडे वळली गौतमाची पावले हे गीत झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश वाघ यांनी पाहुण्यांचा परिचय गणेश यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सारिका बिडकर यांनी केले. आभार रूपाली दुबे यांनी मानले. यावेळी डॉ. दिवाकर कुलकर्णी, सविता कुलकर्णी, किरण बनसोडे, अॅड. सुनील चावरे, श्रीराम धसे, रुपेश बगाळे, रक्त केंद्राचे डॉ. अमर सातपुते,
निवृत्ती मोरे यांची विशेष उपस्थिती होती. यांच्यासह आरोग्य केंद्रातील रेसिंग कलानी, राजेंद्र राक्षे, पिराजी कमले, धनंजय चिद्रावार, सुमेध लोखंडे, अविनाश वाहुळ, वंदना सुरडकर, राजश्री तेलवाडकर, विजया पिंपळकर, सुषमा पाटील, चित्र पंडित, सपना गायकवाड यांसह प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी, सर्व कार्यकर्ते व वस्तीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थितांना खीरदान करण्यात आले. याशिबिराच्या यशश्विते साठी केंद्राचे कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले.