प्लास्टिकचा सर्रास वापर बांधकाम कचरा रस्त्यावर

प्लास्टिकचा सर्रास वापर बांधकाम कचरा रस्त्यावर

छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने सिंगल युज प्लास्टिक विरोधात, तसेच बांधकाम कचरा व्यवस्थापनासाठी व बांधकामाच्या ठिकाणी ग्रीन नेट लावणे सक्तीचे करण्यासाठी पुन्हा एकदा मोहीम उघडली आहे. प्रभागनिहाय कारवाईसाठी पथकांची नेमणूक केली आहे. या पथकांनी बुधवारी १३२ ठिकाणी कारवाया करून ५५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. पालिका प्रशासक जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर स्वच्छ व प्रदूषण मुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना रावबिण्यात येत आहेत. शहरात बंदी असलेल्या सिंगल युज प्लास्टिक विरोधात घनकचरा विभागाने धडक कारवाईसाठी पुन्हा प्रभागनिहाय पथके सक्रीय केली आहेत. या पथकात नागरिक मित्र पथकाचे माजी सैनिक, स्वच्छता निरीक्षक व जवान यांचा समावेश आहे. प्रत्येक प्रभागासाठी एक याप्रमाणे दहा प्रभागांसाठी दहा पथके स्थापन केली आहेत

. ही पथके संबंधित प्रभागामधील व्यापाऱ्यांच्या दुकानांची तपासणी
करून बंदी असलेल्या सिंगल युज प्लास्टिक, ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करुन संबंधित विक्रेत्यांविरुध्द आर्थिक दंडाची आकारणी करत आहेत. बुधवारी या मोहिमेंतर्गत पथकांकडून एकूण १३२ तपासण्या करण्यात आल्या. यात बंदी असलेले प्लास्टिक आढळल्यामुळे ३९कारवायांमधून ५५,००० रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला.

▶ रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकल्यास दंड

रस्त्यांवर बांधकाम कचरा आढळल्यास कचरा टाकणाऱ्याविरूध देखील दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच घरांचे बांधकाम सुरु असल्यास सदर बांधकामाभोवती ग्रीन नेटचे आवेष्टन आहे की नाही, याची खात्री केली जात आहे. आवेष्टन नसल्यास प्रथम नोटिस विशिष्ट मुदतीत बांधकामाभोवती ग्रीन नेटचे आवेष्टन करण्यास संबंधित मालकाला कळविण्यात येत आहे. मुदतीमध्ये बांधकाम आवेष्टित न केल्यास पथकाद्वारे दंडात्मक कार्यवाई करण्यात येत आहे, असे सांगण्यात आले.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *