छत्रपती संभाजीनगर ( प्रतिनिधी) खाम नदी पुनर्जीवन मोहीमेची वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट रॉस सेंटर प्राईज फॉर सिटीजसाठी प्रथम पाच अंतिम स्पर्धकांपैकी एक म्हणून निवड झाली आहे. दरवर्षी या प्रतिष्ठित पुरस्कार अंतर्गत नाविन्यपूर्ण कल्पना, दूरदर्शी नेतृत्व आणि जगभरात शाश्वत आणि सर्वसमावेशक शहरे निर्माण करणाऱ्या परिवर्तनीय प्रकल्पांना निवडले जाते. या वर्षी या पुरुष्काराची थीम, हवामानासाठी सज्ज समुदायांना गती देणे हे आहे. खाम नदी प्रकल्प ६२ देशांतील १४८ शहरांमधून २०० प्रकल्पांमधून मध्ये प्रथम ५ मध्ये निवडले गेले आहे. खाम नदी पुनर्जीवन
मोहीम ही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्ड, वरोंक आणि इकोसत्व यांच्या भागीदारी मध्ये २०२१ यावर्षी सुरू करण्यात आली होती. ही मजबूत भागीदारी हवामानासाठी अनुकूल रिव्हरफ्रंट विकास, प्रदूषण प्रतिबंध, घन कचरा व्यवस्थापन, सक्रिय जनसहभाग आणि नागरिकांच्या सहकार्यमुळे शक्य झाली आहे. २०२१ जानेवारी महिन्यात तत्कालीन मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय ह्यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली होती. त्यानी सी-पी-जी अर्थात सिटिज़न प्रायव्हेट गव्हर्नमेंट (नागरिक खाजगी प्रशासन) या तत्त्वावर ही मोहीम
यशस्वीरित्या राबवली. यामध्ये प्रशासन म्हणून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, औरंगाबाद छावणी परिषद, जिल्हा प्रशासन व अन्य शासकीय संस्थांचा सहभाग आहे. खाजगी भागीदार म्हणून सी आय आय, व्हारोक, इको सत्त्व व अन्य संस्थांच्या सहभाग लाभला आणि नागरिकांचा सहभाग म्हणून दर शनिवारी नदीची स्वच्छता करण्यास, सुशोभीकरण करण्यास व वृक्षारोपण करण्यास श्रमदान म्हणून लाभले सोबतच नदीकाठावर राहणाऱ्या कुटुंबांनी नदी स्वच्छ ठेवण्याचे निर्धार करून सहकार्य केले. जी श्रीकांत, मनपा आयुक्त तथा प्रशासक,छत्रपती संभाजीनगर आपले शहर आताछत्रपती संभाजीनगर आपले शहर आता जागतिक नकाश्यावर आले आहे. वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट रॉस सेंटर प्राईज फॉर सिटीजसाठी प्रथम पाच अंतिम मध्ये छत्रपती संभाजीनगर सोबत न्यू यॉर्क, ब्राझील, अर्जेंटिना व ओस्लो, नॉव्हें मधले प्रकल्पांची निवड झाली असून ही आपला शहरासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. या प्रकल्पाशी जुडलेल्या संस्था, व्यक्ती व नागरिकांचे आणि माझ्या, महानगरपालिकेतील, टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. नदीची स्वच्छता करण्यास वर्षानुवर्षाची मेहनत लागते आणि शहरवास्यांना यासाठी तयार राहण्यासाठी मी आवाहन करतो
