जालना हसनाबाद (प्रतिनिधी) दि. 22/5/2024 ला रात्री 12 ते 1 च्या दरम्यान गावातील एकच घर कुंभार समाजच ते ही वडिलांचं छत्र हरपलेल जवखेडा दानवे ता . भोकरदन जि. जालना येथील घटना असून ते केंद्रीय मंत्री खासदार रावसाहेब दानवे व आमदार संतोष दानवे यांच्या गावातील घटना असून मागील वेळेस ही असाच प्रकार रात्री झालेला होता पोलीस स्टेशन हसनाबाद येथे तक्रार देऊन ही जीवघेणा हल्ला व घर पाडून बेघर करण्याचा प्रयत्न केला होता पण काहीच कारवाई झाली नाही. परत पुन्हा नियोजित प्लान करुन रात्री आमच्या घरावर हल्ला करून लूट मार करुन ,
जीव घेणा कोयता काठ्या लोखंडी पाईप सलया मारहाण करून पूर्ण घर बेचिराख केले आता नगदी राहायला घर नाही उघड्यावरच राहायची वेळ आली . या गावातील गुंडशाही , दादागिरी , दडपशाही संपणार आहे का . आम्हाला या मायबाप सरकार कडून न्याय मिळणार का व आम्हावर झालेल्या अन्याय अत्याचार करण्यारावर कडक कारवाई करुन फौजदारी खटले दाखल करण्यात यावे .जे जे या गोष्टीला खत पाणी , सहकार्य , समर्थन , उत्तेजना प्रेरणा देतात त्यांनाही अटक फौजदारी खटले दाखल झाले पाहिजे. ही हात पाया पडून विनंती करतो