महसूल विभागातील अधिकाऱ्यांची संगमत करून सातबाराला नावे लावले
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधि) : संभाजीनगर शहर सध्या मराठवाड्यात शासकीय जमिनी मोठ्या प्रमाणात भूमाफियांकडून गिळगृत्त करण्यात आलेल्या त्यात जिल्हा अधिकाऱ्यांनी नुकतेच विजय चव्हाण यांना निलंबित करून मोठ्या घोटाळ्याची चौकशी लावली आहे . त्यात असे काही निदर्शनास आले की प्रकरणात भूमाफियांनी महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांची संगणमत करून मोठे जमीन घोटाळे केले आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर हे भूमाफियां यांच्या भ्रष्टाचाराचा मोठा गड मानला जातो. तोच एक प्रकार छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक पर्यटक बौद्ध लेणी परिसरातील पहाडसिंगपुरा भागातील गायरान जमिनी महसूल विभागाची दिशाभूल करून खोटे कागदपत्र बनवून भूमाफियांनी घशात घालण्याचे काम केले आहे. चक्क या जमिनी गायरान असूनही त्याचे सातबाराला फेरफार करून नावे करून घेतले आहे. या सर्व बाबीं महसूल अधिकारी व महसूल मंत्री यांनी लक्ष देऊन हे फेरफार रद्द करावे अन्यथा भूमाफियांची हिंमत इतकी वाढेल की पूर्ण शहर हे अजगराप्रमाणे गिळगृत करतील... वाचा पुढील अंकात कोण कोणत्या गटात झाला आहे भ्रष्टाचार?