मानलेल्या भावानेच दिला दगा ! तिघांनी मिळून बलात्कार केला !
छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) दोन हजार रुपये उसने देण्याचा बहाणा करीत मानलेल्या भावाने दोन मित्रांसह एका ३८ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला. ही घटना शुक्रवारी (दि.५) रात्री आठ वाजता सुमारास जालना रोडवरील केंब्रिज चौका जवळ घडली. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पिसादेवी परिसरात राहणाऱ्या एका ३८ वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि.५) दुपारी मानलेला भाऊ प्रकाश (नाव बदलले आहे) याला फोन केला. माझी कोर्ट केस सुरू असून मी आर्थिक अडचणीत आहे. मला दोन हजार रुपये उसने हवे आहेत, असे तिने त्याला सांगितले. प्रकाशनेही दोन हजार रुपये देण्याची तयारी दाखवली. तिला सावंगी बायपास रोडवर बोलवून घेतले. सावंगी बायपास रोडवर दोघांची भेट झाली. थोडा वेळ चर्चा झाल्यानंतर प्रकाशने तिला माझ्यासोबत चल असे म्हणून दुचाकीवर बसविले. दुचाकी थेट केंब्रिज चौकाकडे घेऊन गेला. तोपर्यंत रात्रीची आठ वाजले होते. तेवढ्यात पांढऱ्या रंगाच्या स्कुटीवर दोन अनोळखी इसम आले आणि ही घटना घडली दरम्यान एम. सिडको ठाण्याचे पोलीस निरीक्षक गौतम पठारे पातारे यांनी सांगितले की, सदर प्रकरण संवेदशील असल्याने अजून तपास सुरू आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत. त्या दोघांनाही लवकरच अटक करण्यात येईल.
एकाला बेड्या दोघांचा शोध सुरू मानलेल्या भावाने केला घात… पिसादेवी परिसरात राहणाऱ्या या ३८ वर्षीय महिलेची कोर्टात केस सुरू आहे. त्यामुळे ती आर्थिक अडचणीत आली होती. यात आर्थिक अडचणीचा मानलेला भाऊ प्रकाशने फायदा घेतला. तिला दोन हजार रुपये मदत करण्याची तयारी दाखवली महिलेला भेटायला बोलावले. मित्रांच्या मदतीने आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेने परिसरात एकच
दागिनेही लुटले केम्ब्रिज चौकाजवळील घटना तिला फरफटत नेले झाडीत…
केंब्रिज चौकातील हॉटेल सूर्याच्या पाठीमागील झाडीत या तिघांनी तिला अक्षरशः फरपटत नेले. तिने विरोध केला तर त्यांनी तिला मारहाण केली. आरडाओरडा करू नये म्हणून तिच्या तोंडात कपड्याचा बोळा कोंबला. अंगावरील कपड्यांनीच तिचे हात पाय बांधले. त्यानंतर असहाय्य या महिलेवर तिघेही तुटून पडले. आळीपाळीने बलात्कार केला तसेच तिच्या अंगावरील २०हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि दहा हजार रुपयांचा मोबाईल लुटून नेला. या हैवानाच्या तावडीत सुटून महिलेने कसेबसे घर गाठले. घडलेला प्रकार पतीला सांगितला. त्या दोघांनी अखेर सिडको एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून शनिवारी (दि. ६) फिर्याद दिली.
