छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): रिक्षाचालक कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेसाठी शासनाकडून ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मंडळाच्या स्थापनेनंतर रिक्षाचालकांना कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यावर ५० हजार रुपयांची मदत दिखणार आहे. यासोबतच विविध आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी कधी असा असा सूर विविध रिक्षाचालक संघटनांकडून उमटत आहे.रिक्षा चालकांना तुटपुंज्या कमाईत आपले कुटुंबाचे उदरनिर्वाह चालवावे लागते. रिक्षा चालकांना आरोग्य, मुलांचे शिक्षण, अपघात अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यासाठी रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळाचीस्थापना व्हावी अशी मागणी जवळपास २००५ सालापासून प्रलंबित होती. आता रिक्षाचालकांची मागणी पूर्ण झाली. त्यामुळे रिक्षाचालकांकडून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. अशी आहे मंडळाची रचना महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळाचे मुख्यालय मुंबईत असणार आहे. राज्यस्तरीय कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष परिवहनमंत्री असणार आहेत. तर सदस्य म्हणून राज्याचे परिवहन आयुक्त असतील. जिल्हास्तरीय कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी असणार आहेत

रिक्षाचालकांना मिळणार या सुविधा जीवन विमा, अपंगत्व विमा योजना आरोग्यविषयक लाभ ,कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसाहाय्य, योजना (५० हजार रुपयांपर्यंत)
पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, महाराष्ट्र कामगार कौशल्य वृद्धी योजना
त्याची अंमलबजावणी लवकर व्हावी…
66 गेल्या अनेक वर्षांपासून रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळाची मागणी होती. शासनाने त्याची स्थापना केली. ती आता पूर्ण झाली आहे. आम्ही खूप आभारी आहोत. त्याची लवकर अंमलबजावणी करुन आम्हाला दिलासा मिळावा
निसार अहेमद खान, अध्यक्ष रिक्षाचालक मालक महासंघ
.