खुलताबाद (प्रतिनिधी) : व्हॉईस ऑफ मीडिया’च्या खुलताबाद तालुकाध्यक्षपदी महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार विजय चौधरी यांची तर कार्यवाहक पदी लोकमत समाचारचे पत्रकार सलमान खान, जिल्हा उपाध्यक्षपदी बाजारसावंगी येथील सकाळ चे जेष्ठ पत्रकार श्रीधर पाटील यांची निवड करण्यात आली आहे. चौधरी हे गेल्या ३१ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना राज्यपाल, मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांच्या हस्ते अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.‘व्हॉइस ऑफ मीडिया ’ ही संघटना देशातील पत्रकारांची अव्वल संस्था म्हणून ओळखली जात आहे. कृतिशील कार्यक्रमामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकारांनी ‘व्हॉइस ऑफ मीडिया ’त आपला हिरीरीने सहभाग नोंदविला आहे. राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया ’ संघटनात्मक बांधणीचा महत्वाचा टप्पा म्हणून उर्वरित शहरात आपल्या कामाची सुरुवात करीत आहे.याचाच एक भाग म्हणून खुलताबाद तालुका कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. यात खुलताबाद तालुका अध्यक्ष म्हणून विजय चौधरी यांची निवड करण्यात आली. ‘व्हॉइस ऑफ मीडिया ’चे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष सतीश रेंगे यांनी चौधरी यांचे अभिनंदन केले आहे.‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही संघटना एक पंचसूत्री घेऊन पत्रकारांच्या हितासाठी काम करणार आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीची चळवळ उभारू असे मत विजय चौधरी यांनी यावेळी व्यक्त केले. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही संघटना देशातल्या २१ राज्यात कार्यरत आहे. पत्रकारांच्या आणि पत्रकारितेच्या हितासाठी लढणाऱ्या या संघटनेत खुलताबाद तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी चौधरी यांच्याकडे देण्यात आली आहे.व्हॉईस ऑफ मीडिया’ या संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले आणि संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष सतीश रेंगे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्र देऊन विजय चौधरी यांचे संघटनेत स्वागत करण्यात आले आहे. संघटनेत काम करू इच्छिणाऱ्या पत्रकारांनी विजय चौधरी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन चौधरी यांच्याकडून करण्यात आले आहे.‘व्हॉइस ऑफ मीडिया ’ची खुलताबाद तालुका कार्यकारिणी जाहीर‘व्हॉइस ऑफ मीडिया ’ ची खुलताबाद कार्यकारिणी जाहीर झाली असून, खुलताबादच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र टाइम्सचे प्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार विजय चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया ’चे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष सतीश रेंगे यांनी विजय चौधरी यांची निवड केली.विजय चौधरी यांनी उर्वरित कार्यकारिणीची निवड करून घोषणा केली. ती कार्यकारणी पुढीलप्रमाणे कार्याध्यक्षपदी उदय खरोटे, उपाध्यक्षपदी रामलाल निंभोरे व कलीमोद्दीन शेख, सरचिटणीसपदी सय्यद इरफान, सहसचिवपदी संतोष करपे, कोषाध्यक्ष पदी रमेश माळी, कार्यवाहक म्हणून सलमान खान, संघटक पदी बाबासाहेब दांडगे, प्रसिद्धीप्रमुखपदी नविद शेख यांची नियुक्ती करण्यात आली, तर सदस्य म्हणून श्रीधर पाटील, बशीरोद्दीन, रमेश अधाने, सुभाष शिंदे, अशोक अधाने यांची निवड करण्यात आली आहे.नवनियुक्त अध्यक्ष विजय चौधरी यांनी आगामी काळात पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत. खुलताबाद तालुका शाखेच्या वतीने पत्रकारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी काम केले जाईल. पत्रकारांसाठी विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. या सर्व उपक्रमात खुलताबाद तालुक्यातील सर्व पत्रकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. टो ओळ : व्हॉईस ऑफ मीडिया’च्या खुलताबाद तालुका अध्यक्षपदी महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार विजय चौधरी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करताना व्हॉईस ऑफ मीडिया छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष सतीश रेंगे, जिल्हा महासचिव अमित फुटाणे, जिल्हा संघटक इश्रार चिस्ती, छत्रपती संभाजीनगरचे शहराध्यक्ष रवी माताड.
