फुलंब्री (प्रतिनिधी : हेमंत वाघ) तालुक्यातील वडोद बाजार येथे दिनांक 23 जानेवारी 2024 मंगळवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडोदवस्ती केंद्र.वडोद बाजार येथे विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान मिळावे, नफा तोटा कळावा या हेतूने शालेय विद्यार्थ्यांची आनंदनगरी हा आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी वडोद बाजार केंद्राचे केंद्रप्रमुख तथा शिक्षण विस्तार अधिकारी श्री.बी.के.गाडेकरसर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.जावेदखान सरवरखान पठाण, वडोदबाजार गावच्या सरपंच श्रीमती.पाकीजाबी साबेरखान पठाण,श्री. गोविंदमामा पांडेजी, श्री. रज्जाकभाई शेख,डॉक्टर सुहास वायकोस, श्री.प्रफुल्ल शिंदे यांच्या हस्ते आनंदनगरीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी चिमुकल्यांनी आपल्या शेतात पिकत असलेला भाजीपाला,फळभाज्या, पालेभाज्या, बिर्याणी,इडली, वडासांबर, कटलीस,भजे,गुलाब जामून,मिसळ,वडापाव, समोसे इत्यादी खमंग व चमचमीत पदार्थांचे 60 स्टॉल लावले होते.खवय्यांनी याप्रसंगी आवडत्या पदार्थांवर यथेच्छ ताव मारला. या बाजारात जवळपास 25 ते 30 हजार रुपयांची उलाढाल झाली. आगळावेगळा कार्यक्रम बघून व प्रत्यक्ष खरेदी विक्रीची अनुभूती घेऊन विद्यार्थी अगदीच भारावून गेले होते.साक्षात दुकानदाराची भूमिका बजावत असताना विद्यार्थी तल्लीन होऊन गेले होते.याप्रसंगी विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.याप्रसंगी पालकांनी प्रचंड गर्दी केलेली होती.याप्रसंगी श्री.साबेरभाई पठाण,श्री शुभम गंगावणे,श्री. राजिकभाई शेख, व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.चिकटे संजय,शिक्षक श्री.उमेश पिंपरखेडकर,श्रीमती. वंदना पाटील,श्रीमती.जयश्री बोराडे,श्रीमती.अनिता काचोळे यांनी अथक परिश्रम घेतले.याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य,गावातील प्रतिष्ठित मंडळी, शिक्षणप्रेमी व सर्व शालेय विद्यार्थ्यांचे पालक आवर्जून उपस्थित होते.
