नक्षत्र वाडी ऑक्टोझोन मध्ये रो-बंगला घेताय सावधान ?

नक्षत्र वाडी ऑक्टोझोन मध्ये रो-बंगला घेताय सावधान ?

निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून ग्राहकांची फसवणूक !

छत्रपती संभाजीनगर ( प्रतिनिधि ) : छत्रपती संभाजीनगर नक्षत्रवाडी खंडोबा मंदिर लगत ऑक्टोझोन येथे रो बंगला नंबर 164 हा श्री सदाशिव विष्णुपंत चौधरी यांनी संतोष कुमार मुथा व सुरेश रुणवाल, सुयोग रुणवाल, यांच्याकडून दि. 01/07/2022 रोजी रीतसर खरेदी केलेला आहे. खरेदी चे व्यवहार पूर्ण होईपर्यंत बांधकाम व्यवसायीक यांनी गोड बोलून आम्ही कुठे पळून जात आहोत. तुमचं जे काही काम असेल आम्ही रजिस्टर पूर्ण झाल्यावर पण पूर्ण करुन देऊ असे तोंडी आश्वासन दिले होते. परंतु त्यात कामाच्या बऱ्याच उणी होत्या जसे की लिकेज, टाइल्स बदलणे, कलर, किचन कटल दुरुस्ती, लाईट, प्लंबिंग, व घर गळत असल्याने वॉटरप्रूफिंग व इतर अनेक कामे निष्कृष्ट दर्जाचे केलेली आहेत. रो बंगलो खरेदी केलेल्या ग्राहकाने वारंवार याची तक्रार ऑक्टोझोन रो बंगलो डेव्हलप करणाऱ्या मालकांना वारंवार फोन द्वारे तक्रार केली असता बांधकाम व्यवसायिक यांनी आज करतो उद्या करतो असे उडवा उडवी चे उत्तर देऊन आतापर्यंत टाळाटाळ करत आहेत.ग्राहकांनी त्यांना फोन केला असता त्या ग्राहकाला बांधकाम व्यवसायाकडून अरेरावी ची भाषेमध्ये उत्तर देण्यात येत आहे.

अरेरावीची भाषा करत आहे काम करत नाही काय करून घ्यायचे ते करून घ्या अशी धमकी ग्राहकांना देत आहे व अन्य काही कामे तुम्ही अर्धवट केलेले आहेत ते पूर्ण करून द्या असे फोन केले असता ते धमक्या देत आहेत काम करत नाही काय करायचे ते करून घ्या दादागिरी ची भाषा बांधकाम व्यवसायिक ग्राहकासोबत करत आहे. अशा व्यवसायिकावर कडक कारवाई करून ग्राहकाला न्याय मिळवून द्यावा जेणेकरून पुन्हा कोणत्याही बांधकाम व्यवसायिकाने अश्या मध्यवर्गीय परिवाराला फसवणूक करू नये सदरील ग्राहकास न्याय मिळवून द्याव्या व बांधकाम व्यवसायिकावर उचित ती कारवाई करावी, अन्यथा राज्यघटना बचाओ संघर्ष संघ लोकशाही मार्गाने आंदोलन करणार.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *