छत्रपती संभाजीनगर (चैतन्य महाले) : बिडकीन पोलीस ठाणे हद्दीत आज दुपारी थरारक प्रकार घडला. बिडकी न बाजार तलाव परिसरात दोन गटांत वादातून चाकू व तलवारीने हल्ला झाला. या हल्ल्यात तब्बल सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना तातडीने शासकीय घाटी रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपींची यादी मोठी असून चेतन टिकेल काळे, टिकेल काळे, रमणाबाई काळे, राजेश काळे, मालताबाई ई., कारलोज काळे, गणेश कमलाकर काळे व सोपान भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या टोळीने धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. दरम्यान, या हल्ल्यात सुकदेव आनंदा भोसले, सुन्न सुकदेव भोसले, आश्विनी सुकदेव भोसले, स्वाती सुकदेव भोसले, सेक सुकदेव भोसले व आर्चना आकाश काळे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे बिडकीन परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. पुढील तपास बिडकीन पोलीस करत आहेत.
