छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील उत्कृष्ट तपास अधिकाऱ्यांचा गौरव !

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील उत्कृष्ट तपास अधिकाऱ्यांचा गौरव !

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यातील गुन्हे तपासात आणि न्यायालयीन कारवाईत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस तपास अधिकाऱ्यांचा आणि कोर्ट पेरवी अंमलदारांचा नुकताच गौरव करण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायालय तसेच प्रथमवर्ग न्यायालयांमध्ये दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी या अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मार्च महिन्यात जिल्हा व सत्र न्यायालयात ३ गुन्ह्यांत आणि प्रथमवर्ग न्यायालयात २१५ गुन्ह्यांत आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. या यशस्वी निकालासाठी तपास अंमलदार श्री. के. एन. गोरे (पो.ह./१८५) व श्री. अनिल दाभाडे (पो.अं./११३७) यांनी गुन्हा र.नं. ३३४/२४ भादंवि कलम ३५४, ३५४(अ), ३५४(ब) अन्वये सखोल तपास करून मुदत चार्जशीट दाखल केली. कोर्ट पेरवी अंमलदार श्री. संभाजी भोजने (पो.अं./१४९१) यांनी मुद्देमाल सादर करणे, सी.ए. अहवाल व साक्षीदार व्यवस्थापनाचे कार्य प्रभावीपणे पार पाडले.त्याचप्रमाणे, लोकअदालतमध्ये फुलंब्री पोलीस ठाण्याचे कोर्ट पेरवी अंमलदार श्रीमती पी. सी. साळवे (पो.ह./१२८४) यांनी ३४ गुन्ह्यांत, सिल्लोड (शहर) पोलीस ठाण्याचे श्री. एम. एम. मेढे (ग्रेड पीएसआय) यांनी २२ गुन्ह्यांत व सिल्लोड (ग्रामीण) पोलीस ठाण्याचे श्री. ढाकणे (पो.अं./१४३३) यांनी १७ गुन्ह्यांत दोषसिद्धी प्राप्त केली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अपर पोलीस अधीक्षक मा. अन्नपूर्णा सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रशंसापत्र देऊन गौरविले. पोलीस अधीक्षक मा. डॉ. विनायकुमार राठोड व अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली आहे.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *