फुलंब्री { प्रतिनिधी हेमंत वाघ} : भाजपाच्या वतीने फुलंब्री तालुक्यातून रविवारी दोन मंडळ अध्यक्ष निवडण्यात आले. त्यात फुलंब्री मंडळ अध्यक्ष म्हणून सूचित बोरसे, तर वडोद बाजार मंडळ अध्यक्षपदी डॉ,गोपाल वाघ यांची निवड करण्यात आली. रविवारी पक्षाचे निरीक्षक ज्ञानेश्वर मोटे यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. यावेळी आमदार अनुराधा चव्हाण, सांडू जाधव, कल्याण चव्हाण, नरेंद्र देशमुख, इलियास शहा, इत्यादी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते निवड झाल्याबद्दल तालुक्यातील जिल्ह्यातील ठिकठिकाणी कार्यकर्त्या व ग्रामस्थांकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहे
