छत्रपती संभाजीनगर – श्रीराम सेनेच्या शहराध्यक्षपदी प्रवीण पावर यांची नियुक्ती करण्यात आली असून, संघटनेच्या कामाला अधिक बळ मिळणार आहे. श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजयराव साळवे यांनी 2 एप्रिल रोजी प्रवीण पावर यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. या वेळी मिलिंद दाभाडे, राज मोरे, शुभम काळे तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी प्रवीण पावर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम उत्साहात पार पडला. शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रवीण पावर यांनी संघटनेच्या कार्यात अधिक जोमाने काम करून समाजहितासाठी निष्ठेने कार्य करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या नियुक्तीने संघटनेमध्ये नवीन ऊर्जा संचारली असून सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.
