खुलताबाद : (प्रतिनिधी सविता पोळके) खुलताबाद नगरपरिषद येथे नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी शेख समीर यांचा शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शेख सलीम जागीरदार आणि पत्रकार संतोष करपे पाटील यांच्या वतीने सदिच्छा भेट घेऊन सत्कार करण्यात आला. या भेटीत खुलताबाद शहरातील विविध विकासात्मक कामांबाबत चर्चा करण्यात आली. विशेषतः शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांसंदर्भातील प्रश्न उपस्थित करण्यात आले. या संदर्भात नगरपरिषद प्रशासनाकडून सकारात्मक सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. मुख्याधिकारी शेख समीर यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचा विश्वास दिला. नागरिकांच्या अडचणी दूर करून खुलताबाद शहर अधिक सुंदर व सुसज्ज करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध राहील, असेही त्यांनी नमूद केले.
