पैठण (प्रतिनिधी) : दि.3 एप्रिल 2025 रोजी इंडुरेंस आणि एम्पोवहर सेवक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रूप ग्रामपंचायत गेवराई बु.अंतर्गत येणाऱ्या होनोबाचीवाडी तालुका पैठण जिल्हा छ.संभाजीनगर येथे किशोरी गटाच्या प्रकल्प सादरीकरनाचा कार्यक्रम सरपंच सौ.प्रतीक्षा आगलावे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच इंडुरेंस कंपनीचे पदाधिकारी श्री.उदय दुधगावकर, एम्पोवहर फाऊंडेशनच्या क्लस्टर कोऑर्डिनेटर सौ.शिल्पा खरात, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पदाधिकारी श्री.गजानंद बोहरा, ग्रामविस्तार अधिकारी श्री.रमेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थित मोठ्या उत्साहात संपन्न झाल होनोबाची वाडी येथे Endurance आणि Empowher Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने मागील एका वर्षापासून सेतू कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाअंतर्गत गावातील किशोरवयीन मुलींनी जीवन कौशल्य प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. या प्रशिक्षणादरम्यान मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे किशोरी गटातील मुलींनी एक गट प्रकल्प सादर केला.
या गट प्रकल्पाचे सादरीकरण आणि गावातील मुलींचा कौतुक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तसेच या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन कुमारी अमृता वैष्णव, आणि गजानंद बोहरा यांनी केले, तर प्रास्ताविक Empowher Foundation च्या क्लस्टर कोऑर्डिनेटर शिल्पा खरात यांनी केले. अध्यक्षीय मार्गदर्शन ग्रामसेवक रमेश जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अर्जुन पिवळ सर आणि गजानंद बोहरा यांचे विशेष योगदान राहिले. तसेच गजानंद बोहरा यांनी किशोरवयीन मुली आणि महिलांसाठीचा 10 सूत्री जाहीरनामा वाचून दाखवला आणि त्या मुद्द्यांचे सर्वांनी पालन करण्यासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली, जसे की मुलीचे लग्न 18 वर्षाखाली करू नये, हुंडा बंदी करण्यात यावी, बेटी बचाओ बेटी पढाओ, गावामध्ये दारू बंदी, व्यसन मुक्ती, असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या ग्रामसभेतून सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, प्रतिष्ठित नागरिक आणि पालक यांच्या सहीने ठराव मंजूर करून घेण्यात आला. आणि मुलींच्या शिक्षणासाठी, सामाजिक प्रतिष्ठेसाठी आणि मुलींच्या कौशल्याला वाव मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे ही गजानंद बोहरा यांनी सांगितले, दीप प्रज्वलनाने तसेच राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान किशोरी गटातील मुलींनी त्यांच्या प्रकल्पाचे सादरीकरण केले. या प्रकल्पातून मुलींच्या आत्मविश्वासात वाढ झाली असून, त्यांनी जीवन कौशल्ये आत्मसात करून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

असे पल्लवी जारे मॅडम यांनी सांगितले,
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल Empowher Foundation आणि Endurance संस्थेचे तसेच आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे गजानंद बोहरा यांनी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले,
यावेळी जि.प.प्रा. शाळेचे मूख्याध्यापक अर्जुन पिवळ सर, शिक्षक परमसेट्टी सर, सदस्य अमरसिंग बहूरे, प्रभाकर आगलावे, कैलास वैष्णव, सुभाष राठोड, राहुल जारवाल, राजू, संजू, मनोज वैष्णव, माखन बहूरे, राजू बहूरे, मनोहर मोघे, विजय दुबे, अनिता चव्हाण, गेंदाबाई जारवाल, मेघा वैष्णव, ललिता गुसिंगे, शारदा वैष्णव, ढवळाबाई वैष्णव, कुशा जारवाल, तसेच किशोरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते