भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला!

भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला!

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेसमोर भ्रष्टाचाराविरोधात उपोषण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या निर्मला भालेराव यांच्या लढ्याला दडपण्यासाठी दबावतंत्र वापरण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गटविकास अधिकारी आहीरे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली असतानाही, त्यांच्यावरच चौकशीची जबाबदारी देण्यात आली. पारदर्शक चौकशीच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते भगवान बनकर यांनी आवाज उठवताच, त्यांच्यावर १० फेब्रुवारी २०२५ रोजी चार वाजता चालत्या दुचाकीवरून लाथ मारून खाली पाडत बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात सुहास वाघचौरे, मुळे धनवयी, गादु भोंडवे, शाखा अभियंता डाहोरे आणि शिवाजी पवार यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे

. चौकशी बंद करण्यासाठी दबाव टाकत, उपोषण थांबवण्याची धमकी देण्यात आली. भगवान बनकर यांनी यापूर्वीच पारदर्शक चौकशीची मागणी करत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. मात्र, चौकशीऐवजी त्यांना धमक्या देत गप्प बसवण्याचा प्रयत्न झाला. या संपूर्ण घटनेनंतर निर्मला भालेराव यांनी राज्य घटना बचाव संघर्ष संघाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली असून, दोषींवर तात्काळ कारवाई व चौकशी निष्पक्ष पद्धतीने व्हावी, अशी मागणी केली आहे. भ्रष्टाचार उघड करण्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांवर हल्ले होणे म्हणजे लोकशाहीवरचाच हल्ला आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *