छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : भाजपचे माजी उपमहापौर श्री विजयजी औताडे यांच्या वतीने शिवपुराण कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मध्य प्रदेश, सिहोर येथील प्रख्यात कथाकार श्री पंडित राघव प्रदीप जी मिश्रा यांनी शिवपुराण कथा सादर केली. भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दिव्य कथामृताचा लाभ घेतला.
या सोहळ्याला भाजपा प्रदेश महामंत्री श्री संजयकुमार केणेकर यांनी उपस्थिती लावली. त्यांनी श्री शिवपुराण आरतीत सहभाग घेत महाराजांचे दर्शन घेतले. तसेच, या पवित्र प्रसंगी उपस्थित भक्तगण व आयोजकांशी संवाद साधला. धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणात हा सोहळा अत्यंत भक्तिभावाने पार पडला. शिवपुराण कथा महोत्सवाच्या माध्यमातून शिवतत्त्वाचे महत्त्व आणि भक्तीमार्गाचा संदेश समाजात पोहोचवण्यात आला. या निमित्ताने श्रद्धाळू भक्तांना पवित्र ग्रंथाचे सार व शिकवण मिळाली. अशा धार्मिक उपक्रमांमुळे समाजात आध्यात्मिकता वृद्धिंगत होत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
