पैठण (प्रतिनिधी) : दि.9 मार्च 2025 रोजी ग्रुप ग्रामपंचायत गेवराई बुद्रुक अंतर्गत येणाऱ्या अब्दुलापूर वाडी (बंजारवाडी) येथील महीला भगिनी यांच्या बोलावण्यावरून भारतीय जनता पक्षाचे बुद्धिजीवी प्रकोष्ठ जिल्हा संयोजक (भाजपा जिल्हा पदाधिकारी) श्री. गजानंद बोहरा यांनी अब्दुलापूर वाडी या गावात भेट दिली असता असे लक्षात आले की आता पर्यंत कसेतरी गावच्या लगतच्या, आजुबाजूच्या विहिरींनवरून पायपीट करत पिण्यासाठी, वापरायला आणि जनावरांसाठी पाणी ग्रामस्थांना मिळत होता परंतु आता मागील 15 दिवसांपासून जमीनीची एकाएकी पाणी पातळी घटली असून विहिरी कोरड्या ठाक पडल्या आहे.

`आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कुठून, अशी गत झाली आहे. त्यावर गजानंद बोहरा यांनी संबंधित सरपंच ग्रामसेवक यांना तसेच पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे साहेब आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब कळवली असून ताबडतोब युद्धपातळीवर पंचनामा करून अब्दुलापूरवाडीसाठी येत्या 4 ते 6 दिवसात पिण्यासाठी, वापरण्यासाठी आणि जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले नाही तर संबंधित सर्व यंत्रणेला, अधिकाऱ्यांना कायदेशीरपणे आपल्या पदाचा राजीनामा देण्यासाठी भाग पाडू असे गजानंद बोहरा यांनी फोन करून तसेच प्रिंट मीडियाच्या माध्यमातून संबंधित यंत्रणेला विनंती वजा इशारा दिलेला आहे. आणि सर्व जनतेला कळवण्यात येत आहे की छ.संभाजीनगर जिल्ह्यातील कोणत्याही गावाला पाण्याची समस्या असेल त्यांनी मला मो.9765556655 या नंबर वर कॉल करून बोलवावे मी त्या गावाला जाऊन भेट देत तिथल्या समस्या जाणून घेत त्या त्या समस्येवर आवश्यक त्या उपाय योजना राबवण्यासाठी संबंधित यंत्रणेला, अधिकाऱ्यांना तात्काळ कामाला लावून ती समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे आवाहन प्रिंट मीडियाच्या माध्यमातून सर्व जनतेला करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने कारवाई करण्यात येणार असल्याचे गजानंद बोहरा यांच्या कडून सांगण्यात आले.
यावेळी ग्रामस्थ रामेश्वर गुसिंगे,आसाराम जारवाल, चत्तरसिंग गुसिंगे, महाजन जारवाल, जयलाल गुसिंगे, विलास गुसिंगे, हारसिंग भोपळात , रोहित जारवाल, ललिता गुसिंगे, फुलाबाई गुसिंगे, शितल गुसिंगे, गोराबाई गुसिंगे, ढवळाबाई गुसिंगे, भिकाबाई गुसिंगे, शितल गुसिंगे, कौशाबाई भोपळात, गोराबाई जारवाल, ताराबाई जारवाल, सुनिता जारवाल, सविता जारवाल, रुखमनबाई गुसिंगे, लता जारवाल उपस्थित होते