छत्रपती संभाजीनगर – शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सातवी हनुमान महाआरती शनिवार रोजी जागृत हनुमान मंदिर, N-12 येथे मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली. या महाआरतीला भाजप प्रदेश महामंत्री श्री. संजयकुमार केणेकर यांनी प्रमुख उपस्थिती लावली. या वेळी श्री. मुकेश जैन, श्री. सागर पाले, श्री. रामेश्वर भादवे, श्री. कमलेश बागरेचा, श्री. रवि राजपूत, श्री. रामलाल बकले, श्री. सतीश ताठे, श्री. राजू पळसकर, श्री. कैलास मुगले, श्री. अमोल पाटणी, श्री. रघुनाथ सुलताने, श्री. दौलत खाडे, श्री. संतोष साखले, श्री. प्रशांत गायकवाड, श्री. संदीप काळे, श्री. कांबळे, श्री. विष्णू जाधव, श्री. डबीर काका, श्री. दळवी काका, श्री. स्वप्नील वेताळ, श्री. उज्वल मगरे यांच्यासह अनेक भाविक भक्त उपस्थित होते. महाआरती दरम्यान संपूर्ण परिसर जय श्रीराम आणि हनुमानाच्या जयघोषाने दुमदुमून गेला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवशंभू प्रतिष्ठानच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
