पैठण (प्रतिनिधी) : दि.8 मार्च 2025 रोजी बांडवाडी (मुरादाबाद वाडी) तालुका पैठण जिल्हा छ.संभाजीनगर येथे (BPL) बांडवाडी चषक 2025 चे मार्केट कमिटी संचालक पैठण तथा कडेठानचे सरपंच श्री.संभाजी पा. तवार, आडूळ बु.चे ग्रा.पं.सदस्य श्री.नारायण पिवळ, आडूळ खुर्दचे माजी सरपंच श्री.अशोक भावले, भाजपा जिल्हा पदाधिकारी गजानंद बोहरा, आडूळ खुर्दचे उपसरपंच विलास गुसिंगे तसेच सांजखेड्याचे सरपंच सोमनाथ वखरे आणि उपसरपंच बाबासाहेब चवळी यांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम, टॉस, आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शाल घालून आयोजकांतर्फे स्वागत करण्यात आला.या टुर्नामेंट मध्ये संभाजी तवार, नारायण पिवळ अशोक भावले यांच्याकडून 41,000 चे प्रथम पारितोषिक, गजानंद बोहरा यांच्यातर्फे 21,000 चे द्वितीय पारितोषिक तर विलास गुसिंगे यांच्यातर्फे 11,000 चे तृतीय पारितोषिक देण्यात येणार असून सामनावीर साठी कपूरचंद गुसिंगे आणि करनसिंग गुसिंगे यांच्यातर्फे 2100 रुपये, बेस्ट बॅट्समनला 11,00 रुपये, बेस्ट बॉलरला त्रिंबक गुसिंगे यांच्यातर्फे 11,00 रुपये, सलग 6 षटकार मारणाऱ्याला 11,00 रुपये, विकेट हॅट्रिक साठी गणेश गुसिंगे यांच्यातर्फे 11,00 रुपये, देण्यात येणार आहे. कमिटीमध्ये कांतिलाल, गुरू, पूनम, संतोष, अभिषेक, सिद्धू, आणि बजरंग सीसी बांडवाडी आहे.यावेळी ग्रामपंचायत सदस्य, युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, पत्रकार, आरटीआय कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टीचे बुद्धिजीवी प्रकोष्ठ जिल्हा संयोजक श्री.गजानंद बोहरा यांनी बांडवाडी चषक 2025 चे आयोजक यांना शुभेच्या दिल्या तसेच आयोजक, मालक आणि सर्व खेळाडूंना सूचना दिल्या की कोणत्याही प्रकारे वादविवाद न होऊ देता खेळीमेळीच्या वातावरणात हे टूर्नामेंट संपन्न झाली पाहिजे. तसेच सर्व खेळाडूंना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा ही दिल्या.
यावेळी भरत जारवाल, संतोष, विक्रम, विशाल गुसिंगे सर्व ग्रामस्थ, क्रिकेट प्रेमी, आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थितीत होते
