पैठण (प्रतिनिधी) : दि.8 मार्च 2025 रोजी ग्रुप ग्रामपंचायत गेवराई बुद्रुक तालुका पैठण जिल्हा छ.संभाजीनगर अंतर्गत येणाऱ्या 4 गावांमध्ये (GPL) गेवराई प्रीमियर लीग चे आयोजन करण्यात आले आहे. या लीगचे उद्घाटन शिवसेना युवा मोर्चा जिल्हा प्रमुख मा.पंचायत समिती सदस्य शुभम भैय्या पिवळ, भाजपा जिल्हा पदाधिकारी गजानंद बोहरा, नगदेश्वर गडाचे महंत परमेश्वरानंद महाराज, गणेश पिवळ, शिवलाल राठोड, दादाराव पिवळ यांच्या हस्ते करण्यात आले.या टुर्नामेंट मध्ये 4 संघ खेळत असून नगदेश्वर 11चे मालक निहालसिंग गुसिंगे, कॅप्टन हिरालाल बीघोत, गजू फायटरचे मालक गजानन महेर, कॅप्टन राहुल राठोड नगदेश्वर फायटर 11 चे मालक सतीश राख, कॅप्टन रामदास राख, आरके फायटरचे मालक राधेश्याम कॅप्टन किरण चव्हाण हे आहेत यावेळी ग्रामपंचायत सदस्य, युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, पत्रकार, आरटीआय कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टीचे बुद्धिजीवी प्रकोष्ठ जिल्हा संयोजक श्री.गजानंद बोहरा यांनी GPL टुर्नामेंट चे आयोजक, मालक आणि सर्व खेळाडूंना सूचना दिल्या की कोणत्याही प्रकारे वादविवाद न होऊ देता खेळीमेळीच्या वातावरणात ही लीग संपन्न झाली पाहिजे तसेच सर्व खेळाडूंना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व ग्रामस्थ, क्रिकेट प्रेमी, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थितीत होते
