छत्रपती संभाजीनगर (पब्लिकराज बिरो): ठरलेल्या मुदतीत ठेवीदारांचे पैसे परत न केल्याने छत्रपती संभाजीनगरच्या सिडको पोलिस ठाण्यात मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीच्या संचालक व अधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिवेश्वर कॉलनी, हर्सूल परिसरातील रामराव मुंडे यांचे ७.४४ लाख व १२% व्याजासह ८.७२ लाख रुपये, त्यांच्या पत्नीचे १२.८४ लाख रुपये, धनंजय पाडळकर यांचे १.७७ लाख रुपये आणि बुधासिंग सिसोदे यांचे ५.९१ लाख रुपये असे एकूण २२.७२ लाख रुपये परत करण्यात आले नाहीत.या प्रकरणी मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीच्या टीव्ही सेंटर शाखेतील सचिव संतोष भंडारी, संचालक आरती संतोष भंडारी, विठ्ठल पांडूरंग रुचके, राजू सतीश काळे, लक्ष्मण रतन पवार, प्रवीण प्रल्हाद मुळे, बाबासाहेब आसाराम दाभाडे, किरण अरुण तौर, तसेच सहायक व्यवस्थापक अविनाश कठाळे आणि कर्मचारी वैभव कांबळे या दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत असून ठेवीदारांना पैसे परत मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
