. . . . म्हणुनच आम्ही बाहेरच्या रुग्णांना घेत नाही आळंद प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे बेजबाबदार उत्तर

. . . . म्हणुनच आम्ही बाहेरच्या रुग्णांना घेत नाही आळंद प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे बेजबाबदार उत्तर

फुलंब्री ( प्रतिनिधी हेमंत वाघ); फुलंब्री तालुक्यातील आळंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना गैरसोय व आरेरावीचा सामना करावा लागत असल्याने या प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे . त्यामुळेच वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या मुक संमतीने अवैध डॉक्टरी व्यवसाय तेजीत सुरू आहे .या केंद्रातील अंदागोंदी व मनमानी कारभारावर अंकुश लावावा अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती तर्फे करण्यात येत आहे नसता प्रा आ केंद्राला कुलुप बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेतर्फे दिला आहे.आळंद ता फुलंब्री येथे दोन वैद्यकीय अधिकारी पदे असून येथे डॉ. शर्वरी मगरकर प्रथम वैदयकिय अधिकारी व डॉ. अक्षय जाधव व्दृतिय वैदयकिय अधिकारी यांची नियुक्ती असल्याचे वैद्यकीय दालनाच्या दारावरील पाटीवरून स्पष्ट दिसते . मात्र येथे फक्त डॉ शर्वरी मगरकर ह्या एकट्याच वैदकिय अधिकारी असल्पाचे कर्मचारी सांगतात . वैद्यकिय अधिकारी मगरकर यांच्या मते त्या सकाळी १२ पर्यंत बाह्य रुग्ण विभागाची ( ओ पी डी ) तपासणी करतात तर दुपार नंतर बाहेर हद्दीतील गावांना त्यांची व्हिजीट दाखवली जाते . यातही मिटींगा असतात त्यामुळे वेळो वेळी बाहेर दौरा – किंवा मिंटीग यामुळे वैद्यकीय दालन बेवारस असते . आळंद हे छत्रपती – संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील महत्वाचे गाव असल्याने परिसरात अपघात – दुर्घटना झाल्यास या शासकीय दवाखान्याची मदत गरजु रुग्णांना महत्वाची आहे परंतु येथे रुग्णांना सेवा मिळणे दुरापास्त होत असल्याने नागरिक इकडे पाठ फिरवून खाजगी डॉक्टरांकडे जातात . त्यामुळे योग्य सेवा मिळत नाही व अर्थिक भुर्दं रुग्ण नातेवाईकांना सहन करावा लागतो . एकादा रुग्ण येथे शासकीय दवाखान्यात दाखल केले तर त्याला सेवा मिळत नाही किंवा रेफर पत्र दिले जाते . प्राथमिक आरोग्य केंद्र वडोद बाजार येथे इमारत बांधकाम सुरु असल्याने येथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या जात नाही त्यामुळे वडोद प्रा आ केंद्रा अंर्तगत असेलेल्या गावातील रुग्णांना आळंद येथे दाखल केले तर उपकाराची भाषा करत सुविधा देण्यासाठी टाळाटाळ केली जाते . कुटुंब नियोजन केल्याचे प्रमाण पत्र मागणी करूनही लवकर दिले जात नाही . असे का ? असे विचारले आसता . . . . म्हणुनच आम्ही बाहेरच्या रुग्णांना घेत नाही .

असे उत्तर वैद्यकीय अधिकारी मगरकर यांनी वृत्तपत्र प्रतिनिधीला कारण विचारले असता भ्रमनध्वनी वरून देण्यात आले . विशेषता ५ वाजेनंतर किंवा सुट्टीच्या दिवशी तुम्हाला आता सुट्टी आहे हे कळत नाही का ? असे उत्तर रुग्णांना दिले जाते तर रात्री – अपरात्री बाळंतपणा साठी किंवा करणा साठी रुग्ण या दवाखान्यात नेल्या नंतर कुणीही उपलब्ध होत नाही . यामुळे अनेक रुग्णांचे हाल होत आहे . या बाबत तालुका आरोग्य अधिकारी यांना फोन केला असता ते कधीच फोन उचलत नाही यामुळे कर्मचाऱ्यांना फावले आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी प्रशासनाकडून उदासिनता व योग्य सहकार्य मिळत नसल्याने उदिष्ट पूर्ण होतांना दिसत नाही . तर पुरुष शस्त्रक्रियेसाठी तयारच होत नाही या सर्व प्रकाराची वरिष्ठांनी ताकाळ दखल घेऊन आळंद प्रा आरोग्य केंद्रातील अंदागोंदी व मनमानी कारभारावर अंकुश लावावा अशी मागणी केली जात आहे . या बाबत तात्काळ कार्यवाही न झाल्यास अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती तर्फे प्रा आ केंद्राला कुलुप बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेतर्फे दिला आहे.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *