आढळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते पोलिस दलामध्ये उत्कृष्ट कामगीरी बाज्यावत असलेले कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी एपिआय मा.शरदचंद्र रोडगे साहेबांचा मुंबई येथील कार्यक्रमात प्राणपत्र देत सत्कार करण्यात आला, त्याच धर्तीवर आडूळ सर्कलच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे छ.संभाजीनगर जिल्ह्याचे
जिल्हा पदाधिकारी श्री गजानंद बोहरा यांच्या हस्ते पाचोड पोलीस स्टेशनचे एपीआय, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मा. शरदचंद्र रोडगे साहेबांचा शाल आणि बुके देत सत्कार करण्यात आला.

राज्यात सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे म्हणून वैजापूर तालुक्यातील वीरगाव पोलीस स्टेशनने मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्यातून मनाचे तृतीय स्थान पटकाविल्यामुळे तत्कालीन प्रभारी अधिकारी आणि विद्यमान पाचोड पोलीस स्टेशनचे सपोनी. शरदचंद्र रोडगे यांचा महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला असता पाचोड येथे भाजपा आडूळ सर्कलच्या वतीने रोडगे साहेबांचा शाल आणि बुके देत सत्कार करण्यात आला. यावेळी बाळू राठोड भाजपा जिल्हाउपाध्यक्ष ओबीसी मोर्चा, नवनाथ साखरे, बळीराम राठोड, संतोष झिरपे, ढबु साखरे, बाळू पाचे आणि मित्र मंडळी उपस्थितीत होते.