पैठण : दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी होनावाची वाडी येथे वॉटर संस्था आणि लार्सन अँड टुब्रो कंपनी व पशुचिकित्सालय आडुळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पदाधिकारी, आरटीआय कार्यकर्ते, पत्रकार, ग्राम पंचायत सदस्य, तथा युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मा.श्री.गजानंद बोहरा यांच्या प्रमुख उपस्थितीत पशू आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. पशुधन विकास अधिकारी डॉ.अश्विनि राजेंद्र मॅडम, कृषी तज्ञ मा.शरद पवार साहेब सोशल डेव्हलपमेंट ऑफिसर, मा.अंकुश लोखंडे सर, दिगंबर राठोड यांनी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये जनावरांचे लसीकरण, पीडित जनावरांचे निदान, लाळ्या खुरकूत लस, गोचीड, खरूज, गोमाशी वरील औषधी, मिनरल मिक्सर, व्हिटॅमिन इ.औषधी ग्रामस्थांना / लाभार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले.

आणि डॉ.अश्विनि मॅडम यांनी गावकऱ्यांना जनावरांची काळजी कशी घ्यावी आणि त्यांचा आहार कसा असावा यांवर मार्गदर्शन केले तसेच गजानंद बोहरा यांनी ग्रामस्थांना विनंती केली की शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालनाकडे वळावे शेळी पालन मोठ्या प्रमाणावर करावी, दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करावा, आणि जनावरांची व्यवस्थित निगा राखावी आणि आपल्या व्यवसायामध्ये वाढ करून आर्थिक प्रबळ व्हावे असे सांगितले. यावेळी मा.ग्रा.पं. सदस्य कैलास वैष्णव, शारदा वैष्णव, संतोष सुलाने, सूरजदास वैष्णव, राजू बोहरा, विजय कवाळे, संजय वैष्णव, रतन, प्रेमसिंग बिघोत, हारसिंग महेर, लखन, मानसिंग सुलाने, लक्ष्मण महेर, रतन मोघे, रामू गायकवाड, गणेश आरसूड, विकास, भास्कर मोघे, तसेच महीला भगिनी, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.