छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगरातील सुरेवाडी सिग्नल येथील जागृत हनुमान मंदिरात आज, शनिवार, १ मार्च २०२५ रोजी, शिवशंभु प्रतिष्ठानच्या वतीने भव्य “हनुमान महाआरती” आयोजित करण्यात आली आहे. ही महाआरती सकाळी १० वाजता (सहावी आरती) होणार असून, भाजपा प्रदेश महामंत्री श्री. संजयकुमार केनेकर यांच्या हस्ते ती संपन्न होईल.शहरातील सर्व हिंदू भाविक भक्तांना या पवित्र महाआरतीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे, जेणेकरून एकत्रित प्रार्थनेतून प्रभु हनुमानाची कृपा प्राप्त होईल.
