छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : गंगापूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायती – राजनगाव वरखेड, अकोली वाडगाव येथे भ्रष्टाचाराने उच्चांक गाठल्याचे उघड झाले आहे. गट विकास अधिकारी सुहास वाघचौरे, शाखाधिकारी आहीरे आणि कुंठे या त्रिकुटाने ठेकेदारांच्या संगनमताने गावकऱ्यांचा विकास निधी गिळंकृत केला आहे. ग्रामसेवक शिवाजी पवार, जो सेवानिवृत्त असूनही बोगस सह्या करून हजारो रुपये उकळत आहे, त्याचाही यात सहभाग आहे.
फसवणूक आणि बनावट योजना – जनतेच्या पैशावर डल्ला
ग्रामपंचायतींमध्ये जलजीवन योजना, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय, गटार बांधणी,१४ वा व १५ वा वित्त आयोग, नरेगा योजना यांसारख्या विकास कामांमध्ये अफरातफर झाली असून ही कामे केवळ कागदावरच राबवली गेली आहेत. चौकशी सुरू होताच संबंधित अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाणघेवाण करून चौकशी थातुरमातुर करण्याचा कट रचला. सत्य समोर आणणाऱ्या कार्यकर्त्याला धमक्या आणि जीवघेणा हल्ला सामाजिक कार्यकर्ते भगवान बनकर यांनी हा गैरव्यवहार उघड करताच त्यांना धमक्या दिल्या गेल्या. गट विकास अधिकारी, ग्रामसेवक शिवाजी पवार, सुनील मस्के आणि सुहास वाघचौरे यांनी त्यांना चुप बसण्यासाठी सांगितले. “तुझेच काम तमाम करू, एमआयडीसीमध्ये तुला कळेल,” असे म्हणत शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या.
१० तारखेला हल्ल्याचा कट – गुंडांच्या माध्यमातून जीव घेण्याचा प्रयत्न
भगवान बनकर यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध आवाज उठवला म्हणून १० तारखेला त्यांच्या मागे भाडोत्री गुंड लावून जीवघेणा हल्ला घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने, त्यांच्या जीवाला धोका टळला असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
गावकऱ्यांचा संताप – कठोर कारवाईची मागणी
ग्रामस्थ, राज्य घटना बचाव संघर्ष संघ, निर्मला भालेराव, राजू अरन आणि वरखेड ग्रामपंचायतमधील जागरूक नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाचा निषेध करत संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गावकऱ्यांनी लिखित निवेदन देऊन बोगस काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर व हल्लेखोरांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे सरकार आणि प्रशासन कधी करणार कारवाई?या प्रकारामुळे गंगापूर तालुक्यातील प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गावकऱ्यांनी दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास लोक संघर्ष उभारण्यास मागे-पुढे पाहणार नाहीत.