फुलंब्री; {प्रतिनिधी हेमंत वाघ}– फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साह मध्ये वडोद बाजार परिसरामध्ये गावांमधील धर्मशाळा येथे सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सायंकाळी गावामध्ये ढोल ताशाच्या गजरावर मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ व शिवप्रेमी यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची उत्सवात साजरी करण्यात आली सरस्वती भवन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सार्वजनिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले व काही विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर भाषण दिले यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त सरपंच ग्रामविकास

अधिकारी सोसायटी चेअरमन ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते